विद्यापीठात अध्यापक विकास कार्यक्रमाचे आयोजन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १४ नोव्हेंबर २०२२ | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था पुणे यांच्यात झालेल्या सामंजस्य करारातंर्गत २१ ते २६ नोव्हेंबर या कालावधी अध्यापक विकास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कालावधीत भौतिकीय शास्त्र प्रशाळा, रासायनिक शास्त्र, रासायनिक तंत्रज्ञान संस्था, जैवशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र प्रशाळा या प्रयोगशाळांमधील उच्च व संशोधन उपक्रम कसे हाताळावे याबाबतचे प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच संगणकशास्त्र प्रशाळा, गणितीयशास्त्र प्रशाळा अंतर्गत संशोधन पध्दती, पेटंट याबाबत देखील मार्गदर्शन केले जाणार असून प्रशिक्षणार्थी संख्या मर्यादित आहे. तरी महाविद्यालये/ परिसंस्था /प्रशाळांमधील विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अध्यापकांनी १५ नोव्हेंबरच्या आत या कार्यक्रमाचे समन्वयक तथा इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख प्रा. ए.एम. महाजन (मो.नं. 8468881365) यांच्याशी संपर्क साधावा. प्रशिक्षणार्थींची निवास व भोजन व्यवस्था विद्यापीठात केली. जाणार आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like