अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा
खान्देश लाईव्ह | १३ नोव्हेंबर २०२२ | अल्पवयीन मुलगी घरात झोपली असतांना तिचे तोंड दाबून तिला मारहाण करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील एका गावात घडली असून याप्रकरणी पिता पुत्रांविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुषण साहेबराव पाटील आणि साहेबराव हरचंद पाटील अशी आरोपींची नावे आहेत.
तिच्यावर भूषण हा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत होता. आपल्या नातीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न होत असल्याचे बघून तिच्या आजीने भूषणला प्रतिकार केला. मात्र अल्पवयीन मुलीच्या आई व आजीला मारहाण करुन तो पळून गेला. काही वेळाने भुषण व त्याचे वडील साहेबराव असे दोघे तेथे आले. त्या दोघांनी याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस अधिक्षक ऋषीकेश रावले पुढील तपासकरत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम