अल्पवयीन बहिणींना पळवून नेल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १३ नोव्हेंबर २०२२ | सख्या अल्पवयीन बहिणींना पळवून नेल्याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून परभणीच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलींच्या आईने चाळीसगाव ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. १५ आणि १७ वर्षाच्या दोघं मुली तालुक्यातील एका गावात आपल्या नातेवाईकांकडे आले होते. येथून दि.७ नोव्हेंबर रोजी सकाळी संतोष कैलास सोनवणे आणि समीर शेख (पूर्ण नांव माहित नाही, दोन्ही रा.परभणी) यांनी संगणमत करुन दोन्ही मुलींना पळवून नेले आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोहेकॉ नितीन सोनवणे तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like