अविष्कार संशोधन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जल्लोषात
खान्देश लाईव्ह | १२ नोव्हेंबर २०२२ | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी मोठ्या जल्लोषात झाला.
कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरू प्रा. एस.टी.इंगळे, प्रमुख पाहुणे म्हणून नॅचरली युवर्स बायोटेक, जळगावचे व्यवस्थापक डॉ. निलेश तेली व नोव्होटा थर्मोटेक प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक आर.वाय. चौधरी यांची उपस्थिती होती. याशिवाय कुलसचिव डॉ. विनोद पाटील, स्पर्धेचे समन्वयक प्रा.एस.आर.कोल्हे, उपसमन्वयक, प्रा.जे.व्ही. साळी, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा. सुनील कुलकर्णी उपस्थित होते.
शुक्रवारी या संशोधन स्पर्धेला प्रारंभ झाला. ४४५ विद्यार्थ्यांद्वारे २८८ मॉडेल्स व पोस्टर्सचे सादरीकरण या स्पर्धेत झाले. शनिवारी सांयकाळी पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी परीक्षकांच्यावतीने बी.जे. राठी यांनी तर सहभागींच्या वतीने राकेश पाटील (धुळे), पल्लवी जाधव (नंदुरबार) यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हास्तरावर झालेल्या अविष्कार संशोधन स्पर्धेचे समन्वयक व उपसमन्वयक डॉ. भूषण कवीमंडन, डॉ. मनोज चोपडा (मु.जे.महाविद्यालय, जळगाव), डॉ. भटू बागूल, डॉ. रवींद्र पाटील (वसंतराव नाईक महाविद्यालय, शहादा), प्रा. एन.एस. पवार, डॉ. एस.के. जाधव (कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिंदखेडा), डॉ. व्ही.व्ही. गिते, डॉ.व्ही.एम. रोकडे (विद्यापीठ कॅम्पस) यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना आर.वाय. चौधरी म्हणाले की, समाजाला आर्थिकदृष्टया परवडणाऱ्या नाविन्यपूर्ण कल्पना संशोधनाद्वारे मांडल्या जाव्यात. तर डॉ. निलेश तेली म्हणाले की संशोधनातील सर्जनशीलतेला वाव देवून नोकरी करणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे व्हा. अध्यक्षीय भाषणात प्रा. माहेश्वरी म्हणाले की, संघर्ष करत उद्योजकतेमध्ये जम बसविलेल्या व्यक्तींचे अनुभव विद्यार्थ्यांना ऐकायला मिळावेत यासाठी आपण उद्योजकांना निमंत्रीत केले आहे. प्रारंभी स्पर्धेचे समन्वयक प्रा.एस.आर.कोल्हे यांनी स्पर्धेचा आढावा सादर केला. सुत्रसंचालन डॉ.जी.ए.उस्मानी यांनी केले. डॉ अजय सुरवाडे यांनी आभार मानले.
अविष्कार संशोधन स्पर्धेचा विविध गटांतील निकाल पुढील प्रमाणे:-
मानव्य विद्या, भाषा, आणि ललित कला शाखा
पदवी गट :- मोड्यूल् प्रथम : वेष्णवी खाकरे, रंजना कुमावत (गरूड महाविद्यालय, शेंदुर्णी)
पोस्टर द्वितीय : एकज्योत मेहता व मुस्कान जीवनानी (आर.सी.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा,शिरपूर)
पोस्टर तृतीय : वैष्णवी नायसे व वैष्णवी जंगले (जी.जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर)
पदव्युत्तर गट :- पोस्टर प्रथम : राहुल पाटील (गरूड महाविद्यालय, शेंदुर्णी)
पोस्टर द्वितीय : बंदना मिश्रा व कांचन मिश्रा (शिक्षणशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि)
पोस्टर तृतीय : सिध्देश्वर खुळे व ज्योती मुरकुटे (आर.सी.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा,शिरपूर)
पदवी-पदव्युत्तर गट :- पोस्टर प्रथम : जयश्री पाटील (शिक्षणशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि,जळगाव)
पोस्टर द्वितीय : रिया जैन (गणितशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव)
वाणिज्य व्यवस्थापनशास्त्र व विधी शाखा
पदवी गट :- पोस्टर प्रथम : कांचन कोळी व रितिका पाटील (एच.आर. पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा,शिरपूर)
पोस्टर द्वितीय : तनिष्का पटेल व अक्षय सोनवणे (व्यवस्थापनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव)
पोस्टर तृतीय : वैभव भोंबे व दिपाली तायडे (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बोदवड)
पदव्युत्तर गट :- पोस्टर प्रथम : गौतम रामराजे व ऋषीकेश राजपूत (एच.आर. पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा,शिरपूर)
पोस्टर द्वितीय : आकांक्षा राजपूत व हर्षदा पाटील (व्यवस्थापनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव)
मोड्यूल तृतीय : शिवराज बारी (गरूड महाविद्यालय, शेंदुर्णी)
पदवी-पदव्युत्तर गट :- पोस्टर प्रथम : चेतन भावसार (एच.आर. पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा,शिरपूर)
पोस्टर द्वितीय : तन्मय भाले (जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूट, जळगाव)
विज्ञान शाखा
पदवी गट :- पोस्टर प्रथम : संयुजा टाकळकर (मु.जे.महाविद्यालय, जळगाव)
मोड्युल द्वितीय : नयनकुमार पाटील व गौरव चौधरी (झेड. बी. पाटील महाविद्यालय, धुळे)
पोस्टर तृतीय : अचल बाधे व शुभांगी सावंत (बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव)
पदव्युत्तर गट :- पोस्टर प्रथम : प्रिया जैन व तेजस्वीनी खाचणे (रसायनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि,जळगाव)
मोड्युल द्वितीय : जीवन पाटील (मु.जे. महाविद्यालय, जळगाव)
पोस्टर तृतीय : अक्षदा कुलकर्णी व स्वाती पाटील (जी.टी. पाटील महाविद्यालय, नंदुरबार)
पदवी-पदव्युत्तर गट :- पोस्टर प्रथम : हुसेन दाऊदी (संगणकशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि)
पोस्टर द्वितीय : आनंदसिंग पाटील (कला, वाणिज्य व विज्ञान महा., नवापूर)
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानशाखा
पदवी गट :- पोस्टर प्रथम : श्लोक सोनवणे व तेजस पाटील (आर.सी.पटेल इन्स्टि. ऑफ मॅनेजमेंट, शिरपूर)
पोस्टर द्वितीय : रेणूका गोहिल व आदिती मारू (रासायनिक तंत्रज्ञान संस्था, कबचौउमवि)
मोड्युल तृतीय : सूरज महाजन (संत मुक्ताबाई महाविद्यालय, मुक्ताईनगर)
पदव्युत्तर गट :- पोस्टर प्रथम : झिया उलहक खान (रासायनिक तंत्रज्ञान संस्था, कबचौउमवि)
पोस्टर द्वितीय : अभिषेक चौधरी व भूषण देसले (भौतिकीयशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि)
मोड्युल तृतीय : कांती चव्हाण (आर.सी.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा,शिरपूर)
पदवी-पदव्युत्तर गट :- पोस्टर प्रथम : महेंद्र महाजन व प्रवीण पाटील (एच.आर. पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा,शिरपूर)
पोस्टर द्वितीय : प्रवीण पाटील (अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरी)
औषधनिर्माण व वैद्यकीय शाखा
पदवी गट :- पोस्टर प्रथम : अनमोल दरत व दिशा दोशी (आर.सी. पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा, शिरपूर)
पोस्टर द्वितीय : वैष्णवी चोपडे व आदिती देहाडराय (आर.सी. पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा, शिरपूर)
पोस्टर तृतीय : युवंतिका पाटील (एच.आर. पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा,शिरपूर)
पदव्युत्तर गट :- पोस्टर प्रथम : अस्मा पठाण व भटू पाटील (आर.सी. पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा, शिरपूर)
पोस्टर द्वितीय : वैभव घोटेकर (आर.सी. पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा, शिरपूर)
पोस्टर तृतीय : साहिल सोनवणे (आर.सी. पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा, शिरपूर)
पदवी-पदव्युत्तर गट :- पोस्टर प्रथम : प्रिती बोबडे (आर.सी. पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा, शिरपूर)
पोस्टर द्वितीय : सोपान नागरे (एच.आर. पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा,शिरपूर)
कृषी व पशुसंवर्धन शाखा
पदवी गट :- पोस्टर प्रथम : भावेश नारखेडे व योगेश्वरी वाघ (मु.जे.महाविद्यालय, जळगाव)
पोस्टर द्वितीय : निकिता ठाकरे व रूचिता सुर्यवंशी (एच.आर.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा, शिरपूर)
पोस्टर तृतीय : प्रथमेश फेगडे व विशाल येवले (धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर)
पदव्युत्तर गट :- पोस्टर प्रथम : निरज पवार (आय.एम.आर.जळगाव)
मोड्युल द्वितीय : श्रृती शर्मा व प्रफुल्ल पाटील (रासायनिक तंत्रज्ञान संस्था, कबचौउमवि)
पोस्टर तृतीय : प्रज्ञा रणदिवे व वृषाली सुर्यवंशी (जैवशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि)
पदवी-पदव्युत्तर गट :- पोस्टर प्रथम : प्रियंका बऱ्हाटे (शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय, जळगाव)
पोस्टर द्वितीय : वंदना चौधरी (जी.जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर)
शिक्षकेत्तर गट :- प्रथम : मोहिनीराज नेतकर (भौतिकीयशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि)
द्वितीय : हेमंत गायकवाड (बी.पी. कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,चाळीसगाव)
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम