अवैध मद्यविक्री ; खिर्डीच्या ढाबे चालकाला २५ हजारांचा दंड

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १३ नोव्हेंबर २०२२ | राज्य उत्पादन शुल्क विभाागाच्या पथकाने बुधवार,९ नोव्हेंबर रोजी रावेर तालुक्यातील खिर्डी येथे एका द्धाब्यावर अचानक छापा टाकून अवैधरीत्या विक्री होणार्‍या दारूला आाळा घालत ग्राहकांसह ढाबा मालकावर कारवाई केली. उभयंतांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर ढाबा चालकास २५ हजारांचा तर पिणार्‍यांना प्रत्येकी तीन हजाराचा दंड करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, सुनील चव्हाण, विभागीय उप आयुक्त अर्जुन ओहोळ, (नाशिक) अधीक्षक जितेंद्र गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारु गुत्ता व ढाब्यांवर अवैधरित्या मद्यसेवन करणार्‍या ग्राहकांवर व त्यांना सेवा देणार्‍या दारु गुत्ता व ढाबा चालक, मालक यांच्यावर विभागीय निरीक्षक सुजित कपाटे यांच्या पथकाने कारवाई केली. खिर्डी येथे तीन हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. ढाबा चालक डिगंबर कोळी व ढाब्यावर मद्यसेवन करतांना ज्ञानेश्वर पंढरीनाथ कोचुरे व भास्कर लक्ष्मण कोळी आढळुन आल्याने त्यांच्यावर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला.संशयीतांची वैद्यकीय तपासणी करीत न्यायालयात दोषारोप सादर केल्यानंतर ढाबा चालकास 25 हजार व मद्यसेवन करणार्‍यांना प्रत्येकी तीन हजार रुपये अश्या एकूण 35 हजार रुपयांचा दंडांची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता नितीन खरे यांनी युक्तीवाद केला.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like