खोटी स्वाक्षरी करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा

खान्देश लाईव्ह | १० नोव्हेंबर २०२२ | समन्स बजावणी अहवालावर दोन साक्षीदार पोलिस कर्मचा-यांसह पंच अशा तिघांच्या बनावट स्वाक्षरी करणा या महिला पोलिस कर्मचा-याविरुद्ध एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस कर्मचा-याने आपली चुक एरंडोल न्यायालयात मान्य केली असून पहिल्यांदाच आपल्याकडून अशा प्रकारची चुक झाल्याचे म्हटले आहे.
सविता रोहिदास पाटील या महिला पोलिस कर्मचारी कासोदा पोलिस स्टेशनला कार्यरत आहेत. समन्स बजावणी. अहवालावर कासोदा पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले साक्षीदार म्हणून पोलिस शिपाई जितेश संजय पाटील, महादू संतोष पाटील तसेच पंच नितीन वसंतराव पवार रा. कासोदा या तिघांच्या सह्या आपण केल्याचे महिला पोलिस कर्मचारी सविता पाटील यांनी कबुल केले .
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम