किनगाव येथे दुचाकी लांबविली
खान्देश लाईव्ह | १० नोव्हेंबर २०२२ | अज्ञात चोरट्यांनी दुचाकीघरासमोरून लांबविल्याची घटना यावल तालुक्यातील किनगावयेथे घडली असून या प्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
किनगाव खुर्द येथील सरफराज युनूस पिंजारी (२५) यांनी मामा शेख नईम शेख सलमी पिंजारी (आमोदा) यांची प्लॅटीना (एम.एच.१९ ए.टी.८८५०) शेती कामानिमित्त घरी आणली होती. रविवार, ६ नोव्हेंबर रोजी दुचाकी घराबाहेर लावली असताना चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघड झाला. पिंजारी यांनी तक्रार दिल्याने यावल पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे पुढील तपास करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम