रस्तालूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; अमळनेर पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १० नोव्हेंबर २०२२ | रस्त्यामध्ये मोठे दगड आडवे टाकून रस्ता लूट करणाऱ्या टोळीचा अमळनेर पोलिसांनी पर्दाफाश केला असून दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत . तालुक्यात रस्ता लूट करणार्‍या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस अधिक्षक एम.राजकुमार अपर पोलीस, अधिक्षक रमेश चोपडे., उप विभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रावले यांच्या निर्देशानुसार आणि पो.नि.जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाने सहा.पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, पोना/मिलींद भामरे, पोना/सुर्यकांत साळुंखे, पोकॉ/राहुल पाटील, पोकॉँ/राजेंद्र देशमाने यांनी दि.०५ नोव्हेंबर रोजीच्या रात्री ८.३० वाजेच्या सुमारास अमळनेर ते चोपडा रोडवरील नविन रेल्वे पुलाच्या पुढे एकुन सहा अज्ञात दरोडेखोरांनी रोडावर मोठे दगड आडवे लावुन रस्ता लुट करण्यासाठी जमले होते. त्यांनी एका टँकर चालकास मारहान करुन जबरीने लुटल्याची घटना घडली होती. अमळनेर पो.स्टे.गु.र.न.५१२/२०२२ भा.द.वि.कलम ३९५, ३९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच यापुर्वी देखील नमुद ठिकाणी असे लुटमारीचे किरकोळ प्रकार झालेले होते परंतु कोणीही तक्रार देण्यास पुढे आलेले नव्हते
अमळनेर पोलिसांच्या .रेकॉर्डवरील गुन्हेगाला ताब्यात घेतले असता त्याने घरफोड्यांची आणि लुटीची कबुली दिली. चोपडा रोड रेल्वे पुलाजवळ कोणासोबत अशा प्रकारची घटना घडुन लुट झाली असल्यास अमळनेर पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like