मी काँग्रेस सोडून भाजपात जाणार नाही – आ. शिरीष चौधरी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २७ ऑक्टोबर २०२२ | दिवाळी पाडव्यानिमित्त रावेर व यावल तालुक्यातील कॉग्रेस पदाधिका-यांची खिरोदा येथे आ. शिरीष चौधरी यांच्या निवास्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती .यावेळी बोलताना आ. शिरीष चौधरी यांनी मी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार नाही असा निर्धार व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजपवर टीका करून भाजप जास्त काळ टिकणार नसून जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून त्या सोडविण्यासाठी लढा देणार असा मनोदयही आ. चौधरी यांनी बोलताना व्यक्त केला. दरम्यान माझयाबाबत मी भाजपात जत असल्याचा अफवा पसरविल्या जात असून या अफवांचे त्यांनी कार्यकर्त्यांसमोर खंडन केले.

याप्रसंगी भाजपवर आ. चौधरी यांनी टीकास्त्र सोडले.बैठकीला कॉग्रेसचे धनंजय चौधरी आर. के. पाटील तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन. गोपाळ नेमाडे, डी. सी. पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, योगेश गजरे, महेंद्र पवार, सुनिल कोंडे, दिलरुबाब तडवी,विलास ताठे यांच्यासह कॉग्रेस पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like