जळगावात विवाहितेचा नवीन घर घेण्यासाठी छळ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २७ ऑक्टोबर २०२२ | नवीन घर घेण्यासाठी माहेरच्यांकडून पैसे आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी चार जणांवर रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरीविठ्ठल नगरात पती दिनेश सोनवणे यांच्यासह गीता दिनेश सोनवणे (वय-२८) या राहत असून त्यांचा विवाह२०१४ मध्ये विवाह झाला. लग्नानंतर पती दिनेश साहेबराव सोनवणे, सासरे साहेबराव पुंडलिक सोनवणे, सासू प्रतिभा साहेबराव सोनवणे आणि दीर हितेश साहेबराव सोनवणे सर्व रा. हरी विठ्ठल नगर जळगाव आदींनी नवीन घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावे, अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून विवाहितेला शिवीगाळ करणे, मारहाण करणे तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली.याबाबत वरील चौघांवर रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक सुनील पाटील करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like