२६ नोव्हेंबरपासून लग्नाची धुमधाम सुरु होणार !

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २७ ऑक्टोबर २०२२ | आपल्या पाल्यांचे लग्न जुळून ते पार पडेपर्यंत पालकांना लगीनघाई लागलेली असते. यंदा एप्रिल महिन्यात गुरूचा अस्त असल्यामुळे या महिन्यात एकही विवाह सोहळा पार पडणार नसून केवळ ५७ मुहूर्त यंदा निघत असल्याने अनेकांनी याबाबतचे नियोजन करून मंगल कार्यालये ,बँड ,केटरर्स ,आचारी ,घोडा ,पुरोहित , आचारी आदी बुक करून ठेवल्याने सर्वत्र हेच चित्र पाहायला मिळत आहे.

२६ नोव्हेंबरला पहिला लग्नाचा मुहूर्त असून ६ नोव्हेंबर ते जूनच्या २८ तारखेपर्यंत विवाहासाठी ५७ मुहूर्त आहेत..या वर्षीही एप्रिलला गुरूचा अस्त आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात एकही विवाह सोहळा होऊ शकणार नाही . मेमध्ये सर्वाधिक १४, तर नोव्हेंबरमध्ये सर्वात कमी चार मुहूर्त आहेत.नोव्हेंबर-२६, २७, २८, २९. डिसेंबर- २, ४, ८, ९, १४, १६, १७, १८. जानेवारी- १८, २६, २७, ३१. फेब्रुवारी- ६, ७, १०, ११, १४, १६, २२, २३, २४, २७, २८. मार्च- ८, ९, १३, १७, १८. मे -२, ३, ४, ७, ८, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २९, ३०. जून- १, ३, ७, ८, ११, १२, १३, १४, २३, २६, २७, २८. हे मुहूर्त वेगवेगळ्या पंचांगांनुसार लग्नमुहूर्त आहेत.

येणाऱ्या एप्रिलला गुरूचा अस्त आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात विवाह होणार नाहीत. त्यामुळे एप्रिल महिना खरेदीसाठी पर्वणीठरणार असून लग्न साहित्य , मंगल कार्यालये आदी संबंधित व्यावसायिकांसाठी मंदीचा कालावधी असणार आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like