चाळीसगावात तरुणांमध्ये हाणामारी ; चॉपर हल्ल्यात एक जण गंभीर जखमी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १५ नोव्हेंबर २०२२ | व्याजाच्या पैशाच्या वादातून सेंट्रल बँकेसमोर तरुणांमध्ये रविवारी रात्री झालेल्या हाणामारीत चॉपरने हल्ला करून  माजी नगरसेवकाचा मुलगा गंभीररित्या जखमी झाला असून याप्रकरणी माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्या फिर्यादीवरून ९ ते १२ जणांविरुद्ध चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकित महेंद्र मोरे (१५) या तरुणाला व्याजाने दिलेले पैसे का परत केले नाही? तसेच अंबड पोलीस स्टेशनला तक्रार दिली अशी विचारणा करत संशयित आरोपींनी चॉपरने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे. यात अंकित मोरे यासह हर्षल राठोड हा तरूणही जखमी झाला आहे. जखमी झालेल्या तरुणांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुमित भोसले, संतोष निकुंभ, श्याम चव्हाण, सुधीर शिंदे, सचिन गायकवाड, अमोल गायकवाड, कृष्णा गायकवाड, योगेश पांचाळ, विक्की पालवे यासह इतर तीन ते चार जणांवर चाळीसगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विशाल टकले हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like