सोने चांदीच्या दरात मोठी घट, लवकर खरेदी करा .

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १४ मार्च २०२२ | भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्याचबरोबर चांदीही स्वस्त झाली आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 1133 रुपयांची घट झाली आहे. तर चांदीच्या दरात किलोमागे 867 रुपयांची घट झाली आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे

रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर होताना दिसत आहे. पेट्रोल डिझेल सह इतर अनेक वस्तूंच्या किमती मध्ये चढ उतार होताना दिसत आहे.आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली, तर चांदीच्या दरात उसळी पाहायला मिळाली. जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५४,१२० रुपये इतका आहे. तर चांदी ७२,०२० रुपये प्रति किलो इतका आहे.

सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम २०० रुपयांनी घसरला. चांदीच्या दरात किलोमागे २०० रुपयांची वाढ झाली.जळगाव सराफ बाजार पेठेत सोन्याच्या भावात ५१० रुपयाची वाढ झाली तर चांदीच्या दरात ९१० रुपयांची वाढ झाली. त्यानंतर मंगळवारी ७१,६१०, बुधवारी ७३,०६०, गुरुवारी ७१,२१०, शुक्रवार ७२,१२० प्रति किलो इतका होता.सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like