15 मार्च रोजी शरद पवारांचा जळगाव दौरा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १४ मार्च २०२२ | दिवंगत माजी आमदार मुरलीधर अण्णा पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण १५ रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे माजी आमदार मुरलीधरअण्णा पवार यांचा पुतळा उभारण्यात आला असून याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी शरद पवार १५ मार्च रोजी जिल्हा दौर्‍यावर येणार आहेत.

जळगावात धरणगाव तालुक्यातील चांदसर १५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी मंत्री सतीश पाटील, आमदार अनिल पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे,अविनाश आदिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे समन्वयक विकास पवार आणि जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी पत्रक प्रसिद्ध करून ही माहिती दिली.शरद पवार यांच्या या दौर्‍यात ते राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात पक्षाचा मेळावा घेण्याची शक्यता वर्तवली आहे .

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like