सेल्फीच्या नादात युवकाचा नदीत बुडून मृत्यू

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १४ मार्च २०२२ | सेल्फी काढण्याच्या नादात अनेक तरुणांनी आपला जीव गमावला. असाच प्रकार जळगाव मध्ये देखील घडला आहे. जळगावात कांताई बंधाऱ्यावर फोटोशूट करण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

शुभम कांतिलाल चव्हाण वय १७, रा. वानखेडे सोसायटी असे मृताचे नाव आहे. शुभम हा बाहेती बारावीच्या वर्गात शिकत होता. रविवारी सुटीचा दिवस असल्यामुळे शुभम हा मित्र मित चव्हाण याच्यासह काही मित्रांसोबत कांताई बंधारा येथे फोटोशूट करण्यासाठी गेला होता. दुपारी ३.३० वाजता नदीकाठी उभा असताना पाय घसरल्यामुळे तो पाण्यात पडला. पोहता येत नसल्यामुळे एका कपारीत अडकल्याने त्याचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. पट्टीच्या पोहणाऱ्या लोकांनी सायंकाळी सात वाजता मृतदेह बाहेर काढला. रात्री ८.३० वाजता मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. मृत शुभमच्या पश्चात आई-वडील व दोन बहिणी असा परिवार आहे. परिवारात मुलाचा मृत्यू झाल्याने दुःख अनावर झाले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like