पेट्रोल डिझेलच्या दरात घट, जनतेला मिळाला दिलासा
खान्देश लाईव्ह | १४ मार्च २०२२ | सरकारी तेल कंपन्यांनी दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरात मागील चार महिन्यापासून पेट्रोल-डिझेल दरात बदल केलेला नाही. नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या उत्तर प्रदेशातील काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी झाले आहेत.रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाचे दर 120 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे पोहोचले आहेत.
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. त्यानंतर तत्काळ या बदललेल्या दरांनुसार अंमलबजावणी सुरू होते. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. पाच राज्यांच्या निवडणुकानतंर भारतात इंधनाचे दर वाढतील असा अंदाज लावण्यात येत होता. मात्र देशात अद्यापही पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.
आज जळगावमध्ये एका लिटर पेट्रोलचा दर ११०.७६ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९३.५१ रुपये प्रति लिटर इतका आहे. यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. ओसीएलकडून प्राप्त माहितीनुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रती लिटर ९५.४१ रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर ८६.६७ रुपये एवढा आहे.
हिंगोली ११०.०७ \ ९३.८४
जळगाव ११०.७६ \ ९३.५१
जालना १११.८८ \ ९४.५९
कोल्हापूर १०९.९७ \ ९२.७७
लातूर १११.२८ \ ९४.०२
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम