जळगाव येथे तासिका तत्वावर उमेदवारांची नेमणूक
खान्देश लाईव्ह I १ डिसेंबर २०२२ I शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे पुढील पदांसाठी तासिका तत्वावर उमेदवारांची नेमणूक करावयाची आहे. तरी इच्छूक अर्हताधारक उमेदवारांनी आपले अर्ज सर्व प्रमाणपत्रासंह संस्थेच्या कार्यालयात दिनांक 6 डिसेंबर, 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत
शिल्प निदेशक यांत्रिकी उपकरण, आर.ए.सी, मेकॅ. मोटर व्हेईकल, मशिनिस्ट, एमएमटीएम, गणित/ अभि. चित्रकला) उमेदवार संबंधीत व्यवसायातील आय.टी.आय व सी.टी.आय. उत्तीर्ण असावा किंवा संबंधीत शाखेतील अभियांत्रीकी पदवीका / पदवीधारक असावा, अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
सदरच्या नेमणूका या निव्वळ तासिका तात्पुरत्या स्वरुपात करण्यात येणार असून उमेदवारांना शासकीय नियमानुसार मानधन देय राहिल, असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम