बोरखेडा येथे वृद्धाला बेदम मारहाण
खान्देश लाईव्ह | २७ ऑक्टोबर २०२२ |बैलगाडी शेतातून घेवून गेल्याच्या कारणावरून वृद्ध व्यक्तीला ६ जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथे घडली असून याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसंत जयराम पाटील (वय-६५) रा. बोरखेडा ता. धरणगाव हे आपल्या राहतात. वसंत पाटील यांनी स्वप्नील उर्फ पन्नालाल गोरख पाटील याच्या शेतातील बैलगाडी घेवून गेल्याची घटना घडली. याचा राग आल्याने स्वप्नील उर्फ पन्नालाल पाटील, गोरख पाटील, अरूण पाटील, आशाबाई गोरख पाटील, लताबाई अरूण पाटील, अतुल पाटील रा. बोरखेडा ता. धरणगाव यांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ मोती पवार करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम