रवींद्र पंढरीनाथ यांचे ३१ रोजी ऑनलाईन व्याख्यान

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २८ ऑक्टोबर २०२२ |कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार सेवा विभागाच्यावतीने खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी व्याख्यानमालेत अंधश्रध्दा निर्मूलन कायदा विशेषंकाचे संपादक रवींद्र पंढरीनाथ यांच्या व्याख्यानाचे आयोजन दि.३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे.

यावेळी विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या संचालक प्रा.मधुलिका सोनवणे हया अध्यक्षस्थानी असतील. हे व्याख्यान सोमवार दि.३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता झुम लिंक (Meeting ID 8192480930 Pass code 999429) व्दारे ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आले आहे. युट्युब व फेसबुक वरुन सुध्दा हे व्याख्यान ऐकता येईल. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या व्याख्यानाची लिंक उपलबध करुन देण्यात येणार आहे अशी माहिती विभागाचे संचालक प्रा.आशुतोष पाटील यांनी दिली.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like