जळगावात अज्ञात माथेफिरूने चारचाकी , दुचाकी जाळली

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २८ ऑक्टोबर २०२२ | अज्ञात माथेफिरूने गणपती नगरातील चारचाकी आणि दुचाकी वाहन जाळल्याची घटना आज पहाटे २८ रोजी घडली . या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. .

येथील रहिवाशी असलेले श्रीची नरवानी यांच्या मालकीची कार अज्ञात माथेफिरुने आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास जाळल्याचे लक्षात येताच नरवानी यांनी अग्निशमन दलाला आणि रामानंद नगर पोलीस ठाण्याशी संपर्क केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत नरवानी यांची कार मोठ्या प्रमाणावर जळून नुकसान झाले आहे. नरवानी यांची कार जाळल्यानंतर माथेफिरुने परिसरात आणखी एक दुचाकी देखील जाळल्याची प्रकार समोर आला. याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असून तपस सुरु आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like