चोपडा तालुक्यात मुलीचा विनयभंग ; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २८ ऑक्टोबर २०२२ |अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यासह पीडितेच्या नातेवाईकांना मारहाण केल्याची घटना चोपडा तालुक्यातील एका गावात घडली असून याप्रकरणी ३ जणावर अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहत असून दि २७ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पीडित मुलीच्या आई व मावशीसह शिवीगाळ आणि मारहाण करून मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्या प्रकरणी दीपक ठाकरे, संदीप ठाकरे व समाधान ठाकरे याच्याविरोधात अडावद पोलिसात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास स.फौ.जगदीश कोळबे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like