मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
खान्देश लाईव्ह | २८ ऑक्टोबर २०२२ | मुक्ताईनगरच्या एकनाथराव खडसे समर्थक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आ. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे खडसे गटाला धक्का बसला असून राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे बोलले जात आहे. .
आ.चंद्रकांत पाटील यांनी जळगाव येथील विश्रामगृहावर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला . यावेळी आ.चंद्रकांत पाटील, रेंभोटा येथील छोटू पाटील, वाघाडीचे भैय्या पाटील, भूषण पाटील, दिलीप पाटील सर, संदीप पाटील, नगरसेवक आरिफ आझाद, पियुष मोरे, मुकेश वानखेडे उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम