मनवेल येथे झाडाला दोरी बांधून वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
खान्देश लाईव्ह | ४ नोव्हेंबर २०२२ | यावल तालुक्यातील मनवेल येथील ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीने झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता उघडकीस आली असून याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यंशवत काशिनाथ इंधाटे (६५) असे मयताचे नाव आहे. या इसमाने प्रविण पाटील यांचा शेतातील निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत बुद्धभुषण मंगल इंधाटे याने यावल पो.स्टेला दिलेल्या खबर वरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम