अल्पवयीन मुलाकडून चोरीच्या २ दुचाक्या जप्त
खान्देश लाईव्ह | ४ नोव्हेंबर २०२२ |यावल तालुक्यातील अंजाळा येथील एक विधिसंघर्ष मुलाकडून २ दुचाक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केल्या आहेत.
पोलीस अधीक्षक एम. राज कुमार व अपर पोलीस अधीक्षकचंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना दुचाकी चोरींबाबत तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार किसन नजनपाटील दि.३ नोव्हेंबर रोजी माहिती मिळाली की, अंजाळा ता. यावल येथे विधी संघर्षीत बालक याच्याकडे चोरीच्या मोटार सायकली असून त्यांची तो कमी किमतीत विक्री करीत आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी पोलीस अंमलदार सफौ/युनुस शेख इब्राहिम, पोहेकॉ दिपक शांताराम पाटील, पोहेकॉ/महेश आत्माराम महाजन, पोना/ नंदलाल दशरथ पाटील, किरण मोहन धनगर, भगवान तुकाराम पाटील, राहुल बैसाणे, चापोहेका/भारत पाटील यांचे पथक तयार करून त्यांना अंजाळा ता. यावल येथे रवाना केले. याठिकाणी पथकाने विधी संघर्षीत बालकाकडून सावदा पोलीस स्टेशन गुन्हयांतील चोरीच्या २ मोटार सायकली जप्त केल्या. सदर मोटार सायकली बाबत विधी संघर्षीत बालक अधिक विचारपुस करता त्याने सावदा गावातील बाजारपट्ट्यातुन चोरी केल्याचे सांगत असून त्याचा साथीदार तेजस सपकाळे हा असल्याचे सांगितले आहे. एलसीबीच्या पथकाने तेजस सपकाळे याचा शोध घेतला असता तो घरी मिळून आला नाही. वरील गुन्हयांतील दोन्ही मोटार सायकली सावदा पो.स्टे. च्या ताब्यातदेण्यात आल्या आहेत. विधी संघर्षात बालक यास त्यांचे वडिलांनी सावदा पोलीस स्टेशनला हजर केले आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम