लिपीक वर्गीय गट क कर्मचाऱ्यांसाठी सेवा विभागीय परीक्षा
खान्देश लाईव्ह | ४ नोव्हेंबर २०२२ | महाराष्ट्र शासन, वित्त विभागांतर्गत संचालक, लेखा व कोषागार, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी 8 वी महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट –क सेवा विभागीय परीक्षा ( भाग 1 व 2) ही दिनांक 26 ते 30 डिसेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत ठेवण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन, वित्त विभागाचे अधिकृत संकेतस्थळ महाकोष (www.mahakosh.maharashtra.gov.in) मधील परीक्षा या सदरात याबाबतचे सविस्तर परिपत्रक दिनांक 19 ऑक्टोंबर रोजी प्रसिध्द करण्यात आले आहे.
नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांना त्यांच्याकडील जे लिपीक वर्गीय कर्मचारी यांना परीक्षा द्यावयाची आहे व जे परीक्षा देणेसाठी पात्र ठरतात त्या क्रर्मचाऱ्यांचे अर्ज परिपत्रकात नमुद केलेप्रमाणे दिनांक 15 नोव्हेंबर रोजी कार्यालयीन वेळ संपण्यापुर्वी सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक लेखा कोष भवन, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, नाशिक – 424002 या पत्त्यावर पोहचतील याप्रमाणे पाठविण्याचे आवाहन सहसंचालक, लेखा व कोषागारे नाशिक विभाग नाशिक निलेश राजूरकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम