पैसे चोरण्याचा प्रयत्नात असणाऱ्या तरुणीला अटक
खान्देश लाईव्ह | ४ नोव्हेंबर २०२२ | चाळीसगावच्या स्टेट बँकेतून पैसे काढणाऱ्या महिलेच्या हातून पिशवीतुन पैसे काढण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या परप्रांतीय तरुणीला रंगेहात पकडण्यात आले असून तिची दुसरी सहकारी मात्र पसार झाली. याबाबत चाळीसगाव पोलिसांत दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोरस येथील वंदना पाटील ह्या पती दिलीप पाटील यांच्या खात्यातून ५० हजारांची रोकड गुरुवारी दुपारी काढल्यानंतर २० हजारांची रोकड आपल्या पिशवीत टाकल्याचे संशयिताने पहिले. त्यानंतर धारदार वस्तूने पिशवी कापण्याचा प्रयत्न केल्याने वंदना यांच्या हाताला ईजा झाली . त्यांनी चोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरडा-ओरड केल्यानंतर अंजली शिवप्रसाद शिसोदीया वय २२ हिला पकडण्यात आले तर तिची सहकारी मालती धर्मेंद्र शिसोदीया पिपलीया, ता.पचोर, जि.राजगड) ही पसार झाली.दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अंजलीला अटक करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक सचिन कापडणीस तपास करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम