वाघळी खूनप्रकरणातील आरोपीला एमपीमधून अटक
खान्देश लाईव्ह | १६ ऑक्टोबर २०२२ | चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे क्षुल्लक कारणावरून १८ वर्षांच्या मोहन विजय हडपे या तरुणाचा १२ ऑक्टोबर रोजी खून करण्यात आला होता. याप्रकरणातील फरार आरोपी साजीद मुसा खाटीक (रा. वाघळी) याला मध्यप्रदेशातील खेतीया येथून जळगाव स्थानिक गुन्हे पथकाने शनिवारी १५ ऑक्टोबर रोजी दुपारी अटक केली.
वाघळी येथील मोहन हडपे याचा गावातीलच सय्यद मुसा खाटीक, साजिद मुसा खाटीक, आदिल साजीद खाटीक, तनवीर साजिद खाटीक, समीर सय्यद खाटीक यांनी लोखंडी रॉड डोक्यात टाकून व पोटात चाकू भोसकून खून १२ ऑक्टोबर रोजी केला होता. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित साजिद मुसा खाटीक हा फरार होता. फरार आरोपीच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला तो मध्यप्रदेश मधील खेतीया गावात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी संशयिताला अटक करण्यासाठी पथक रवाना केले होते . याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम