लग्नात हुंडा कमी दिला म्हणून विवाहितेचा ५ लाखांसाठी छळ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १६ ऑक्टोबर २०२२ | लग्नामध्ये हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून विवाहितेकडे माहेरहून ५ लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री आशिष पवार (वय-२४) असे पीडित विवाहितेची नाव असून तिचे लग्न आशिष पवार यांच्याशो २६ डिसेंबर २०२१ रोजी झाले होते. मात्र काही दिवस चांगले गेल्यानंतर लग्नात हुंडा कमी दिला म्हणून माहेरहून ५ लाख रूपये आणावे याचा तगादा लावून तिचा छळ करण्यास सुरूवात करण्यात आली. विवाहिता गर्भवती असल्याने गर्भपात करण्याचीही तिला धमकी देण्यात आली.

१५ ऑक्टोबर रोजी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून पती आशिष प्रभाकर पवार, सासू खटूबाई प्रभाकर पवार, जेठ किशोर प्रभाकर पवार, जेठाणी अमृता किशोर पवार आणि नणंद कविता पंकज साळुंखे सर्व रा. नांदेड ता. धरणगाव जि.जळगाव यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक उमेश ठाकूर करीत आहे.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like