शेतकऱ्याच्या गोडाऊनमधील १८ क्विंटल कापूस चोरटयांनी चोरला
कृषी सेवक | १६ ऑक्टोबर २०२२ |शेतकऱ्याने आपल्या शेतातील गोडाऊनमध्ये ठेवलेला १८ क्विंटल कापूस सुमारे २ लाख ७० हजार रुपयांचा अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे घडली असून याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्याचे काम सुरु आहे. .
तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष त्रंबक बाविस्कर असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांचे नांद्रा ते पहाण रस्त्याला लागून असलेले शेत गट क्रं. १४७ या ठिकाणी गोडाऊन असून यामध्ये शेतीचे अवजारे व शेतीचा माल ठेवण्यात येतो . सुमारे चार ते पाच दिवस सुरू असलेल्या कापसाच्या वेचणीतील अंदाजे १८ क्विंटल कापूस हा गोडाऊनमध्ये होता. १६ ऑक्टोबर रोजी ते सकाळी सहा वाजता यावेळेस शेतातील गोडाऊन वर गेले त्यावेळेस त्यांना गोडाऊनचे कुलूप तुटलेलेआढळून आले. तसेच १८ क्विंटल कापूस १५ हजार रुपये क्विंटल भावाने २ लाख ७० हजार रुपयांचा कापुस अज्ञात चोरट्यांनी लांबविला.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम