तांबापुरात महिलेवर तीक्ष्ण हत्याराने वार ; चौघांविरुद्ध गुन्हा
खान्देश लाईव्ह | १६ ऑक्टोबर २०२२ | मुलगा शौच करण्यासाठी गेला असता त्याला हाकलून दिल्याचा जाब विचारण्यासाठी मुलाची आई गेली असता चौघांनी तिच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून जखमी केल्याची घटना शनिवारी तांबापुरा परिसरातील मच्छी मार्केटजवळ घडली होती याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, अफसाना सलीम अन्सारी हि महिला तांबापूरा परिसरातील मच्छी मार्केटजवळ आपल्या कुटुंबियांसह राहत असून तिचा मुलगा हा १५ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शौचासाठी गटारीजवळ गेला असता सद्दाम खाटीक याने त्याला हाकलून दिले. मुलाला का हाकलले याचा जाब विचारण्यासाठी अफसाना अन्सारी या गेल्या असता सद्दाम खाटीक याच्यासह त्याचे वडील व भाऊ हे त्यांना शिवीगाळ करु लागले. याचवेळी सद्दामच्या पत्नीने घरामधून तीक्ष्ण हत्यार आणून दिल्याने सद्दाम याने महिलेच्या डोक्यात वार केले . तसेच भांडण सोडविण्यास आलेल्या अनवारी सलामी अन्सारी, सासू मेमुताबी ईमाउद्दीन अन्सारी, दिराणी समीता सलामी अन्सारी यांनाही खातील कुटुंबीयांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम