जळगावच्या विवाहितेचा २ लाखांसाठी छळ ; पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १६ ऑक्टोबर २०२२ | शिक्षिकेची नोकरी करणाऱ्या विवाहितेला दागिने आणि व्यवसायासाठी माहेरहून २ लाख रुपये आणावेत या मागणीसाठी शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या पतीसह ६ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षिका निकत समीर शेख (वय-४०) ह.मु.आकसानगर जळगाव येथे माहेर असणाऱ्या यांचा विवाह भुसावळ येथील समीर उर्फ शरीफ रशिद शेख यांच्याशी रितीरिवाजानुसार सन-२०१५ मध्ये झाला असूननिकट शेख यांना पती समीर शेख याने विवाहितेला माहेरहून सोन्याचे दागिने, फर्निचर आणि व्यवसाय करण्यासाठी २ लाख रूपये आणावे अशी मागणी केली.मात्र विवाहितेने व्यवसायासाठी पैसे न दिल्याने तिला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. यासोबतच सासरच्या मंडळींनी सुद्धा विवाहितेकडे पैशांची सातत्याने मागणी लावून धरली होती. त्यांनी शनिवारी १५ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीसस्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पती समीर उर्फ शरीफ रशिद शेख, करामत रशिद शेख , शेख रशिद शेख अहमद, सईद रशिद शेख , रजिया रफिक शेख, अमीना रौफ शेख सर्व रा. गौसिया नगर, भुसावळ यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like