जळगावात महिलेचा विनयभंग करणाऱ्या वृद्ध व्यक्तीविरोधात गुन्हा
खान्देश लाईव्ह | १६ ऑक्टोबर २०२२ | माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव अशी मागणी करून अन्यथा जीवे ठार मारेल अशी महिलेला धमकी देणाऱ्या ६१ वर्षीय वृद्ध व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बळीराम पेठ भागात हि घटना घडली.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, शहरातील बळीराम पेठेत ४२ वर्षीय महिला राहत असून संशयित विजय विनायक काळकर (वय-६१) याने महिलेस ती १५ रोजी रात्री घरी जात असताना रस्त्यात गाठून माझ्याशी संबंध ठेव असे म्हणत तिची ओढणी ताणून तिला शिवीगाळ आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत महिलेने शहरपोलीस स्टेशनला काळकर याच्याविरुद्ध तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनार करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम