यावल येथून तरुणी बेपत्ता
खान्देश लाईव्ह | १६ ऑक्टोबर २०२२ | शहरालगत असणाऱ्या कुंभारटेकडी या गावातून एक १८ वर्षीय तरुणी शिवण क्लासला जाऊन येते असे सांगून निघून गेल्याची घटना येथे घडली असून याप्रकरणी पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , कुंभारटेकडी परिसरात राहणारी १८ वर्षीय तरुणी घरात आई आणि भाऊ असताना १५ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिवण क्लासला जाऊन येते असे सांगून निघून गेली . तिचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने याबाबत रविवारी पोलीस ठाण्यात ती हरविल्याची तक्रार देण्यात आली असूनतपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बालक बाऱ्हे हे करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम