अवैध वाळू वाहतूक करणारे ४ ट्रॅक्टरांवर कारवाई
खान्देश लाईव्ह | ९ नोव्हेंबर २०२२ | गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतुक करणार्या चार ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी कारवाई केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरणा नदीपात्रातून निमखेडीसह खेडी खु. मार्गे वाळूची अवैध वाहतुक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनामिळाल्यानुसार पथकाला याबाबत कारवाईच्या सुचना दिल्यानंतर पथकाने दुपारी २ वाजता निमखेडी शिवारातून खोटेनगर, गुजराल पेट्रोलपंपाजवळी हॉटेल क्रिष्णा व आव्हाणे फाट्याकडून जळगावकडे तर खेडी खु. शिवारातून विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरने वाळूची अवैध वाहतुक करणारे चार ट्रॅक्टर पकडले ट्रॅक्टर चालक राजेंद्र सोनवणे (वय-३०, रा. खेडी खुर्द पोस्ट कढोली ता. एरंडोल), गणेश कोळी (वय-२९, रा. पाळधी बु. कोळीवडा ता. धरणगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम