गावठी पिस्तुलासह दोघे ताब्यात

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ९ नोव्हेंबर २०२२ | चारचाकीत पिस्तूल खरेदी विक्री करताना दोघांना पोलिसांनी तालुक्यातील सत्रासेन गावाजवळ ताब्यात घेतले असून प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा तालुक्यातील सत्रासेन गावाजवळील फाट्याजवळ एम.एच.१९.१४३० क्रमाकांची चारचाकी गाडीत विना परवाना गावठी पिस्तूल खरेदी करून विक्री करण्याच्या उद्देशाने असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यातील दोन संशयित आरोपी छगन किसन कोळी (वय ७२) व ज्ञानेश्वर मोहन शिरसाठ नामक व्यक्ती या दोघांच्या ताब्यातून २५ हजार रुपये किमतीची गावठी बनावटीचे स्टीलचे रिकामे पिस्तूल व ३ लाख रुपये किमत असलेली चारचाकी गाडी पोलिसांनी ताब्यात घेवून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पोहेकॉ.शिवाजी बाविस्कर पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like