जळगावातील गोडाऊनमधून ६० हजारांच्या दागिन्यांची चोरी
खान्देश लाईव्ह | ९ नोव्हेंबर २०२२ | दरवाजाचा कडीकोयंडा तोडून स्वातंत्र चौकातील व्यावसायिकाचे गोडावूनमधून ५८ हजार ५०० रुपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .
स्वातंत्र्य चौकामध्ये साईबाबा मंदिरासमोर मिरा आनंद जोशी या राहत असून घराच्या बाजूलाच त्यांचे गोडावून आहे. सोमवारी ७ नोव्हेंबर रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गोडावूनचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करून ३० वर्षांपुर्वी खरेदी केलेले ५ तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, २ तोळ्याचा पोहेहार, ३ तोळ्याचे मंगळसूत्र, ७ ग्रॅम वजनाचे कानातील रिंग व १ तोळ्याची सोन्याची चैन असा एकूण ५८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. हा प्रकार मंगळवारी ८ रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आला. मिरा जोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम