भुसावळात बंद घर फोडले ; अडीच लाखांचा ऐवज लंपास

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ४ डिसेंबर २०२२ I शहरातील श्रीनगर परिसरात महिलेचे बंद घर फोडून २ लाख ५६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमा अर्जून ढोलपूरे (वय-२७) रा. श्रीनगर विठ्ठल मंदीरासमोर भुसावळ हे २५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान त्यांचे घर बंद करून बाहेरगावी गेल्या होत्या. घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले. यात एकुण १ लाख रूपयांची रोकड आणि १ लाख ५६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकुण २ लाख ५६ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी महिलेने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मोहम्मद अली सैय्यद करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like