महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर
खान्देश लाईव्ह I ६ डिसेंबर २०२२ I भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन चांगदेव ग्रामपंचायत सरपंच श्री निखिल बोदडे यांनी आयोजीत केला होता,याप्रसंगी चांगदेव येथील ग्रामस्थांनी तसेच समाजबांधवांनी भरपूर प्रतिसाद दिला.
तरी मुक्ताईनगर येथून सुद्धा तरुण समाजबांधवांनी उत्साह दाखविला त्याबद्दल चांगदेव ग्रामपंचायत तर्फे त्यांचे आभार ,रक्तदान शिबिर येथे उपस्थित सरपंच निखिल राजेंद्र बोदडे, उपसरपंच दत्तू चौधरि, डी एल भंडारे ग्रामविकास अधिकारी,पंकज कोळी माजी सरपंच,अतुल पाटील माजी सरपंच सुपडू बोदडे,गोकुळ पाटील,कृष्णा भोम्बे तंटामुक्ती अध्यक्ष,नबी पिंजारी,मिथुन महाजन(वरिष्ठ लिपिक) सदानंद चौधरी व जळगाव सरकारी मेडिकल कॉलेज चे डॉक्टर कर्मचारी वर्ग उपस्थित होते..
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम