डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात संवाद कौशल्यावर व्याख्यान

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ६ डिसेंबर २०२२ I मनातल्या गोष्टी इतरांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचविण्यासाठी कौशल्यपूर्ण संवादाची गरज असते. आपण कोणीही असो, आपल्याला इतरांशी योग्य पद्धतीने बोलता यायला हवे तसेच डॉक्टरांनी रुग्णांशी संवाद साधतांना त्याला आपलेसे कसे करता येईल, यासाठी संवाद कौशल्य अंगी असणे गरजेचे असून त्यासंदर्भातील टिप्स यावेळी रेडक्रॉस सोसायटीचे संचालक गनी मेमन यांनी विद्यार्थ्यांना दिल्यात.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मंगळवार, ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्‍त संवाद कौशल्य या विषयावर गनी मेमन यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलतांना मेमन म्हणाले की, पैसा म्हणजे आयुष्य नाही, व्यक्‍तीमत्व खुलून दिसण्यासाठी सकारात्मकता असणे गरजेचे आहे. आई-वडिलांचे आपल्याबाबतीत अनेक स्वप्नं असतात, त्यांना अभिमान वाटावा असे वागावे, गर्व करु नका, मी पणा करु नका, तरच तुम्ही यशाचे उच्च शिखर अचूक संवाद कौशल्याद्वारे गाठू शकतात, असेही ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, प्रा.डॉ.अमृत महाजन, प्रा.डॉ.विठ्ठल शिंदे उपस्थीत होते. यावेळी वक्‍ते गनी मेमन यांनी त्यांच्या शैलीने दिलेल्या व्याख्यानाद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. सूत्रसंचालन व आभार प्रा.डॉ.अमृत महाजन यांनी केले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like