कापड दुकान फोडून दुकानातील १ लाख ४५ हजार रुपयांची रोकड लंपास

खान्देश लाईव्ह I २० डिसेंबर २०२२ I कापड दुकान फोडून दुकानातील १ लाख ४५ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहरातील बळीराम पेठेतील संत कंवरराम मार्केटमधील न्यू गोवर्धन कलेक्शनयेथे घडली आहे. याबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजा दयालदास पारवाणी (वय-५४, रा. सिंधी कॉलनी, कंवर नगर, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे जळगाव शहरातील बळीराम पेठेतील संत कंवरराम मार्केटमध्ये न्यू गोवर्धन कलेक्शन कापड नावाचे दुकान आहे. कापड विक्री करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. नेहमीप्रमाणे रविवारी १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता दुकान बंद करून राजा पारवाणी हे घरी गेले. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कापड दुकानाचे शटर उचकावून दुकानातील गल्लाचे लॉक तोडून १ लाख ४५ हजार रुपयांची रोकड चोरून नेण्याचे उघडकीला आले. सोमवारी १९ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे ९.३० वाजता एका चहा टपरीवाल्याला चोरी झाल्याचे लक्षात आले. तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात दुपारी ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम