१४ वर्षीय वयोगटातील फुटबॉल स्पर्धेत पोदार शाळेचा मुलामुलींचा संघ विजयी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २० डिसेंबर २०२२ I जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सोमवारी १९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता झालेल्या १४ वर्षीय वयोगटातील फुटबॉल स्पर्धेत पोदार शाळेचे मुले व मुलींचा संघ विजयी ठरला आहे.

जळगाव महापालिकेच्या वतीने जिल्हास्तरीय व महापालिकास्तरीय १४ वर्षाआतील फुटबॉल स्पर्धेचे आयोजन जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सोमवारी १९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्हास्तरीय स्पर्धेत १५ मुलांचे संघ आणि ५ संघ मुलींचे होते, तर महापालिका स्तरीय स्पर्धेत मुलांचे १६ संघ तर मुलींचे ६ संघ होते. आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत पोदार स्कूलच्या मुलांचा आणि मुलींचा संघ विजयी ठरला आहे.

विजयी झालेल्या संघास फुटबॉल असोसिएशन व स्पोर्ट्स हाउसच्या वतीने पदके व चषक देण्यात आले. याप्रसंगीजिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख, क्रीडा अधिकारी एम के पाटील व सह सचिव अब्दुल मोहसीन यांच्यासह फुटबॉल स्पर्धेचे विजयी व उपविजयी संघ उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like