ग्रा. पं.च्या निकालानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दगडफेकीत तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २० डिसेंबर २०२२ I ग्रामपंचायतीचा आजसर्वत्र निकाल जाहीर करण्यात आला. बहुतेक ठिकाणी विजयाची मिरवणूक देखील काढण्यात आली आहे. जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द गावात विजय मिरवणूकीत झालेल्या दगडफेकीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जामनेर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीची निवडणूकीची मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द ग्रामपंचात निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार गावात गेले असता त्यांच्यावर विरोधी गटाच्या पॅनलकडून काही लोकांनी जोरदार दगडफेक करण्यात आली.

या दगडफेकीत धनराज शिवराम माळी रा. टाकळी खुर्द हा तरूण गंभीर जखमी झाला होता. त्यांला तातडीने जामनेर येथील उपजिल्हाप रूग्णालयात नेत असतांना त्याचा मृत्यू झाला. या घटनेमूळे टाकळी खुर्द गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून जामनेर पोलीसांनी गावात धाव घेतली .

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like