दिवाळी कीट वाटपात मोठा घोटाळा ; राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
खान्देश लाईव्ह | २८ ऑक्टोबर २०२२ |दिवाळीपुर्वी रेशनधारकांना देण्यात आलेल्या दिवाळी कीट वाटपात मोठा घोटाळा झाला असून संबंधित ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस महानगरच्या वतीने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना शुक्रवारी २८ ऑक्टोबर रोजी देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महानगरचे जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला जिल्हाध्यक्ष मंगला पाटील, रिंकू चौधरी, अरविंद मानकरी, इब्राहिम पटेल, अशोक सोनवणे, अमोल कोल्हे, दत्तात्रय सोनवणे, रहीम तडवी, मजहर पठाण, रमेश बऱ्हाटे, राजू बाविस्कर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम