ट्रकची दुचाकीला धडक ; मामा भाची जागीच ठार

बातमी शेअर करा

चोपडा तालुक्यातील रेलच्या मारुती मंदिरासमोरील घटना

खान्देश लाईव्ह | २८ ऑक्टोबर २०२२ | भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या वळणावर दुचाकीला दिलेल्या धडकेत मामा भाची जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास चोपडा तालुक्यातील रेलच्या मारुती मंदिरासमोर घडली.

आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास रेलच्या मारुती मंदिरासमोरील नागमोडी वळणावर चोपड्याकडून धरणगावकडे जाणारी दुचाकी (क्र.एमएच १९ सीएच ५१७४) ला समोरून येणारा ट्रक (क्र.एचआर५६ बी ४६८८) ने जोरदार धडक दिली. या अपघातात एक सहा वर्षीय विधी कोळी हि बालिका आणि दुचाकी चालक आबा कोळी (रा. दहिदुले ता.धरणगाव) जागीच ठार झाले आहे. तर एक महिला गंभीर जखमी आहे तर दीड वर्षीय चिमुकला मात्र, सुखरूप आहे. घटनास्थळी सपोनि संतोष चव्हाण, पोहेकॉ प्रदीप राजपूत, पोहेकॉ जितेंद्र चव्हाण, पोकॉ प्रमोद पवार, पोना हेमत कोळी कर्मचारी  पुढील कार्यवाही सुरु केली होती.

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like