चाळीसगावात घरफोडी ; ७२ हजारांचा मुद्देमाल लंपास

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I  शहरातील मालेगाव नाका येथील अक्षदा मंगल कार्यालयाजवळ बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने असा एकूण ७२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून येण्याचे समोर आले आहे. या संदर्भात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सुरेश आनंदाराव जाधव (वय-५९) रा. गायत्री अपार्टमेंट, जुना मालेगाव नाका, अक्षदा मंगल कार्यालयाजवळ, चाळीसगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवार ६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता ते कामाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने घर बंद असल्याचे संधी साधत बंद घर फोडून घरातील लोखंडी कपाटात ठेवलेल्या पेटीतून ७२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. सायंकाळी रात्री ९ वाजता सुरेश जाधव हे घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे समोर आले. त्यांनी तातडीने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like