सुख, शांती, समृद्धी तेव्हाच नांदते जेव्हा आई असते – नैमिषारण्य गादिपती शैलेंद्र शास्त्री

बातमी शेअर करा

गोदावरी आईंचा न भुतो न भविष्यती सन्मान सोहळा थाटात

खान्देश लाईव्ह I ८ डिसेंबर २०२२ I कशी मावेल चार ओळीत आई तुझ्या ममतेची महती…, सद्विचारांची गुंफण करीत मायेचा पाझर ही तुझी ख्याती… आईची महती स्पष्ट करणार्‍या या ओळी कानावर पडल्या की ऊर भरुन येतो. असाच काहीसा भावनिक आणि तितकाच कृतज्ञता व्यक्‍त करणारा सोहळा म्हणजे गोदावरी आईंचा मातृवंदन सोहळा. गोदावरी परिवाराच्या आधारस्तंभ असलेल्या गोदावरी आई ह्यांचा मातृवंदन सोहळा न भुतो न भविष्यती अशा स्वरुपात मोठ्या थाटात पार पडला. हा मातृवंदन सोहळा उपस्थीतांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.

गोदावरी परिवारातर्फे गोदावरी आई पाटील ह्यांचा मातृवंदन सोहळा बुधवार, दि.७ डिसेंबर रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला प्रमुख उपस्थीती म्हणून नैमिषारण्य व्यास गादीपती परमपूज्य भागवताचार्य शैलेंद्रजी शास्त्री यांची सपत्नीक उपस्थीती लाभली. यावेळी सर्व धर्मगुरुंचीही उपस्थीती होती. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांच्याहस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी आई गार्डनचेही उद्घाटन करण्यात आले. मातृवंदन सोहळ्याप्रसंगी आमदार शिरीशदादा चौधरी, अरुणभाई गुजराती, माजी विधानसभा अध्यक्ष, महाराष्ट्र, रमेशदादा चौधरी, माजी आमदार, रमेश विठू पाटील, कुटूंबनायक भोरगाव लेवा पंचायत, प्रदिपदादा पवार, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस, ऋषीकेश जोशी, जळगाव, दारा मोहम्मद, नक्षराध्यक्ष, रावेर, नंदकुमार बेंडाळे, अध्यक्ष, केसीई सोसायटी, अ‍ॅड.संदिप भैय्या पाटील, माजी जिल्हाध्यक्ष, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, विष्णू भंगाळे, लेखक व.पु.होले सर सावदा, डॉ.अतुल सरोदे सावदा, श्री बाबू शिवराम वंजारी, लोहारा, पी.टी.धनगर सर रावेर,श्री.वासु नरवाडे सरपंच विवरा तसेच सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, माध्यम विभागातील प्रतिष्ठांची उपस्थीती होती. मान्यवरांनी आपली मनोगतेही व्यक्‍त केली. डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल सावदा व भुसावळ तसेच गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून गोदावरी आईंना मातृवंदनाच्या शुभेच्छा दिल्यात.

यावेळी गोदावरी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, डॉ.सौ.सुषमा पाटील, फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.सौ.वर्षा पाटील, श्री.सुधाकर भारंबे, सौ.प्रमिला भारंबे, डॉ.सौरभ पाटील, सीए सौ.अस्मिता पाटील, डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, श्री.सागर वायकोळे, सौ.इशिता वायकोळे यांच्यासह मलकापूर येथील श्री व सौ.अनिल पाटील, डॉ.सुहास व डॉ.सौ.सुरेखा बोरले, डॉ.अक्षता बोरले यांची विशेष उपस्थीती होती. या सोहळ्यात आजींच्या जीवनावर आधारित हितगुत या ५० पानी पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. तसेच विविध मान्यवरांनी गोदावरी आईच्या प्रति भावना व्यक्‍त केलेला साप्ताहीक गोदावरी परिवारचा विशेष अंक प्रकाशित करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी विशेषाकांचे कौतुक केले. याप्रसंगी गोदावरी आईंची श्रीमद् भगवत गीता ग्रंथाने तुला करण्यात आली. वेदाच्या मंत्रोपचात राजपूरोहीत डी.टी राव व ब्रम्हवृंदानी गोदाईच्या निरोगी आयुुष्याची कामना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उस्मानी यांनी तर आभार डॉ.केतकी पाटील यांनी मानले.

आईच्या दुरदृष्टीतून गोदावरी साम्राज्याची निर्मिती – डॉ.उल्हास पाटील

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णसेवा सुरु झाल्यापासून गोदावरी आईचे रावेर चोपड्यासह सर्वच भागातील रुग्णांवर लक्ष असायचे, ती नेहमीच रुग्णालयात येवून रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस करायची. आईच्या दुरदृष्टीतून गोदावरी साम्राज्य निर्माण झाले आहे . त्यामुळे गोदावरी आई ही फक्‍त आमची नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्याची आई असल्याचे प्रतिपादन गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी केले.

सुख, शांती, समृद्धी तेव्हाच नांदते जेव्हा आई असते – नैमिषारण्य गादिपती शैलेंद्रजी शास्त्री

प्रत्येक मुलासाठी आईचा आशीर्वाद हा मोलाचा असतो. त्यातून जीवन जगण्याची दिशा मिळते. आज या सोहळ्याच्या माध्यमातून डॉ.उल्हास पाटील यांनी समाजाला एक नवी दिशा दिली आहे तसेच आदर्शही निर्माण केला आहे. कुटूंबात सुख शांती समुद्धी तेव्हाच नांदते जेव्हा घरात आई असते त्यामुळेच पाटील परिवार एवढ्या गुण्या गोविंदाने नांदत आहे, आयुष्य खूप लहान आहे, त्यामुळे आनंद वाटत चला, असे आवाहनही यावेळी नैमिषारण्य गादिपती शैलेंद्रजी शास्त्री यांनी केले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like