भडगाव येथे महिलेचा विनयभंग ; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I भडगाव तालुक्यातील ३७ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसचे विवाहितेच्या पती आणि जेठ यांनी धमकी व शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी एकावर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडगाव तालुक्यातील एका गावात ३७ वर्षीय विवाहिता आपल्या पती, सासू व सासऱ्यांसोबत वास्तव्याला आहे. सोमवारी ५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता विवाहिता सासू व सासऱ्यांचा जेवणाचा डबा देण्यासाठी जात असतांना गावातील समाधान संजय महाजन याने विवाहितेचा रस्ता आडवून अश्लील वक्तव्य करून तिचा विनयभंग केला. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेचा पती आणि चुलत जेठ यांनी समजविचा प्रयत्न केला असता त्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. याबाबत विवाहितेने भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी समाधान संजय महाजन याच्या विरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोहेकॉ पंचशिला निकम करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like