कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध
खान्देश लाईव्ह | २९ ऑक्टोबर २०२२ | शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीतर्फे आज जळगावात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यांचा घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला.
शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडी महानगर, पालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे अल्पसंख्याक अल्पसंख्यांक महानगर आघाडी प्रमुख जाकीर पठाण, विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, उप महानगर प्रमुख गणेश गायकवाड, फरीद खान, पिंटू सपकाळे, शिवसेना अल्पसंख्याक महानगर प्रसिद्धीप्रमुख इक्बाल शेख, शकील बागवान, शोएब खाटीक डॉ. जुबेर युनूस शेख, बाळा कंखरे, अंकुश कोळी, आबिद खान, इमरान भिस्ती, मतीन सय्यद, अमन भाई, मोहीन शेख, आसिफ शाह, आसिफ शेख, अरबाज शाह, आफताब मिर्झा, तलीफ सय्यद, शहील खान, सादीस शाहअरबाज पटेल, सोनू पठाण, आदी उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम