विहिरीत पडून खोदकाम मजुराचा मृत्यू

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २९ ऑक्टोबर २०२२ |विहीरीत पडल्याने बुडुन एका खोदकाम करणाऱ्या मजुराचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना यावल तालुक्यातील भालोद येथे घडली . दारासिंग बाबुराव जाधव , (वय ५० वर्ष रा. मांडवा दिगर तालुका भुसावळ)असे या मयत मजुरांचे नाव आहे.

कामानिमित्ताने भालोद येथे आलेले मजुर हे दिनांक २८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास भालोद शिवारातील दिलीप चौधरी यांच्या शेतातील विहीरीत आपल्या काही मजुरांसह विहीरीचे खोदकाम आटोपुन क्रेनव्दारे विहीरीतुन वर येत असतांना विहीरीत पडुन पाण्यात बुडुन मरण पावल्पाची घटना घडली आहे.

दारासिंग जाधव यांच्या पश्चात पत्नी , दोन मुली, एक मुलगा असे परिवार आहे. याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.

 

 

 

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like