एकनाथराव खडसाच्या तक्रारीवर मिळाले शेतकऱ्यांना नवीन ट्रान्सफॉर्मर

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १ मार्च २०२२ | रावेर तालुक्यातील खिरोदा शेत-शिवारातील वीज कंपनीचे ट्रान्सफॉर्मर जळाल्याने केळी बागायती धोक्यात आली होती. या संदर्भात माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी दखल वीज कंपनी अधिकार्‍यांना सूचना केल्या. खिरोदा येथील फैजपूर रस्त्यावरील शेती शिवारातील शेतकर्‍यांची डीपी जळाल्यामुळे फरफट होत होती. वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांकडे तक्रार करूनही त्यांनी नवीन ट्रान्सफॉर्मर देण्यास टाळाटाळ करीत होते.

काँग्रेसचे आमदार असलेल्या शिरीष चौधरी यांच्या गावातील शेतकर्‍यांचा प्रश्न भाजपचे पदाधिकारी असलेल्या डॉ.विजय धांडे यांनी मध्यस्थी करीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून सोडवल्यानंतर या घटनेची तालुक्यात मोठी चर्चा राहिली. यावेळी खिरोदा येथील शेतकरी उमेश चौधरी, रोझोदा येथील शेतकरी लिलाधर झांबरे, लखीचंद नेहेते, रुपेश हडपे, केतन इंगळे, हर्षल नेहेते, डॉ.विजय धांडे व शेतकरी उपस्थित होते.

शेतकर्‍यांनी आमदार शिरीष चौधरी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे डीपी मिळण्याची मागणी केली. त्यानंतरही प्रश्न न सुटल्याने व 20 दिवस उलटल्याने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेण्यात आली. . दोन दिवसात साहित्याची पूर्तता करून डीपी, तारांसहित, वीज जोडणी करून देण्यात आल्याने मुक्ताईनगरात जावून खडसे यांचे आभार मानण्यात आले. शेतकर्‍यास ट्रान्सफार्मर मिळाल्याने केळी बागांचे होणार नुकसान टळले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like